कालही मी तोच होतो आजही मात्र मी तोच आहे
प्रत्येकाच्या दृष्टीकोनातून मी मात्र वेगळा आहे .....
कालच होतो लहान मुल मी आज मात्र तरुण आहे
जबादारीची जाणीव होऊन आज मात्र गंभीर आहे .....
काळाचे आठवताना उद्याचे पण भान ठेवत आहे
भविष्यातल्या सुखाची मी आज सुरवात शोधत आहे .....
उध्वस्त संसारात माझ्या नवी उमेद शोधात आहे
वाकून गेलो पुरता तरीही उभे राहायचे शिकत आहे .....
संकट असले जीवावर बेतलेले तरी धैर्याने तोंड मी देत आहे
धीरोदात्त लढण्यासाठी बळ मला दैव माझे देत आहे ......
good 1
ReplyDelete