दिल्यावर होकार तिने त्याने सोडीला दीर्घ श्वास
पण तिच्यासाठी तो फक्त होता टाईमपास ....
वाहिले सर्वस्व त्याने तिला खास
पण तिच्यासाठी तो फक्त होता टाईमपास ....
विसरला तो "मी" पण तिच्यासाठी खास
पण तिच्यासाठी तो फक्त होता टाईमपास ....
कॉलेज मध्ये असताना बुडविले तास
पण तिच्यासाठी तो फक्त होता टाईमपास ....
वेळेप्रसंगी दिला त्याने त्याच्या तोंडातील घास
पण तिच्यासाठी तो फक्त होता टाईमपास ....
केले दोन दोन प्रेझेटेशन तिच्यासाठी खास
पण तिच्यासाठी तो फक्त होता टाईमपास ....
तिच्या परीक्षेच्या वेळी स्वतःचा सोडीला अभ्यास
पण तिच्यासाठी तो फक्त होता टाईमपास ....
ती आजारी असताना जागवल्या रात्री अनेक
पण तिच्यासाठी तो फक्त होता टाईमपास ....
रात्री अनेकवेळा होत असे त्यास तिचाच भास
पण तिच्यासाठी तो फक्त होता टाईमपास ....
शपथ घेतली पूजीन तुला जोपर्यंत असेल श्वास
पण तिच्यासाठी तो फक्त होता टाईमपास ....
तिच्यासाठी चालला तो नेहमी अनेक कोस
पण तिच्यासाठी तो फक्त होता टाईमपास ....
शिक्षणासाठी तिच्या घेतिले जास्तीचे क्लास
पण तिच्यासाठी तो फक्त होता टाईमपास ....
तिच्यामुळे त्याच्या उतरला करिअरचा क्लास
पण तिच्यासाठी तो फक्त होता टाईमपास ....
विचारले त्याने जेव्हा लग्नासाठी खास
ती म्हणाली तेव्हा: "आता पुरे झाले बास"
कधीच नव्हतास तू माझ्यासाठी तसा खास
होतास तू फक्त माझ्यासाठी टाईमपास ....
------ विकास सोमण
दिनांक : ०७ / ०४ / २०११
No comments:
Post a Comment