Wednesday, 27 April 2011

U are there!!!!


When I required friend
I know U were there ...

When I was in nightmare
I know U were there ...

I want to increased speed required Gear
I know U were there ...

To protect myself from rays of bad things required glairs
and I know U are again there ...

I was under depression's strong layer
I know U were there ...

Now when I got Director's Chair
I know U were there ...

Now Today I required My Pair
I know U are only there...

---- Vikas Soman
08 / 04/ 2011


Life ....


Life is like a Strong race 

we take every moment as grace 


Life's beauty is in its own way

u can just think of the Clay 


it gives u sorrow it gives u pain

u still receives experience thats ur gain.


Life is the real gift of GOD

its just like a musical cod ....

-- Vikas Soman 

18/04/2011

दूरिया .....


हम चाहते थे मिलना उनसे हर वक्त
पर time ही ना था ये exam कम्बख्त ....

हर पाल उनकी याद सताती है
पल्को मे भी हर बार पानी जमाती है ....

याद आते है वो हसीन दिन आज भी
क्या पता अब मिलना होगा अब कब कहा भी ....

कैसे हम दोनो वो शाम बीता करते थे
मन मन मे ही एक प्यारा सा संसार बस ते थे ....

ये दूरिया भी कितनी बेचैन हुमे करती है
अब आखे भी आपसे मिलने को तरसती है ....

ना दूर कर पायेगी ये दूरिया हुमे
दूर होकार भी पास मेहसूस करेंगे हम तुम्हे .....

वाद राहा आपसे हमारा हमारे आखिरी लब्ज तक
ना बिछड देंगे हम तुम्हे मरते दम तक .....
-- विकास सोमण
२०/०४/२०११

Sunday, 24 April 2011

हल्ली हे असेच होते .....


हल्ली हे असेच होते
सुख दिसले कि दु:ख मागे येते
आनंदाच्या क्षणांना ते
आपल्यासमोर पळवून नेते .....

हल्ली हे असेच होते
उन्हात सावली दिसावी
अन् लगेच ती गायब व्हावी
तापत्या उन्हात तिने आपली साथ सोडावी.....

हल्ली हे असेच होते
दु:ख नशिबी आले की भाग्य पाठ फिरवते
जसे मरायला टेकलेले मांजराला
जणू कावळ्यांची टोळी चोच मारते

हल्ली हे असेच होते
कितीही ठरवले तरी मन उदास राहते
स्वतःस गुंतवून घेतले तरी
दु:ख कायम पाठी लागते ......

हल्ली हे असेच होते
कितीही चांगले असलो तरी
जग आपली परीक्षा बघते
आपल्याविरुद्ध कितीतरी कारस्थाने रचत असते ....

हल्ली हे असेच असते
तुम्ही कितीही चांगले वागा
तुमची फसवणूक होते
तुमच्या प्रेमळ स्वभावाची मात्र जग चेष्टा करते ......

हल्ली हे असेच होते...
मन आनंदी असते
दु:खासमोर मात्र
डोळ्यातून पाणी ओघळते ....


------ विकास सोमण

२४/०४/२०११

Friday, 22 April 2011

उमेद .....


कालही  मी  तोच  होतो  आजही  मात्र  मी  तोच  आहे 
प्रत्येकाच्या  दृष्टीकोनातून  मी  मात्र  वेगळा  आहे  .....


कालच होतो  लहान  मुल  मी  आज  मात्र  तरुण  आहे 
जबादारीची  जाणीव  होऊन  आज  मात्र  गंभीर  आहे  .....

काळाचे  आठवताना  उद्याचे  पण  भान  ठेवत  आहे 
भविष्यातल्या  सुखाची  मी  आज  सुरवात  शोधत  आहे  .....

उध्वस्त  संसारात  माझ्या  नवी  उमेद  शोधात  आहे 
वाकून  गेलो  पुरता  तरीही  उभे  राहायचे  शिकत  आहे  .....

संकट  असले  जीवावर  बेतलेले  तरी  धैर्याने  तोंड  मी  देत आहे 
धीरोदात्त  लढण्यासाठी  बळ मला  दैव  माझे  देत  आहे  ...... 

मोठेपणी लहानपण ...


हवी असते सर्व मस्ती पण मन असते पांढरपेशी
दाखवायचे जगाला आपण नाही त्या देशी

करायची असते लहानासारखी मस्ती
अजूनही असते अंगात तशीच चुस्ती

मोठेपणा येत असतो नेहमीच आनंदाआड
पण लहान असताना सगळेच असतात द्वाड

अजूनही तशीच मस्ती मनातून मात्र करायची असते
पण मोठेपणामुळे त्याला मुरड घालावीच लागते

तरीही कधीतरी लहानपणासारखी करावी मस्ती
मोठेपणाची घालवावी मनातली भीती

कारण शेवटी हा पण management चा एक भाग असते
सगळ्यांत कुठेतरी नक्कीच लहानपण दडलेले असते .....
- - - विकास सोमण
०८/०४/२०११

उखाणे क्रिकेट styale.....


नवीन उखाणे क्रिकेट styale :

१. सचिनच्या खेळला मुजरा करते वाकून
टिंब टिंब च नाव घेते त्याला bauncer टाकून

२. खेळात खेळ लाडक्या युवराजच्या फलंदाचीचा
प्रेमात प्रेम खर आमच्या फक्त टिंब टिंब च

३. आज पासून सुरु होत आहे इंडिअन प्रीमिअर लीग
टिंब टिंब चा नाव घेते उतरली नाही अजून विश्वकापाची झिंग

४. पहिल्याच चेंडूवर सेहवाग मारे फोर
टिंब टिंब नी ठेवलाय बागेमध्ये मोर

५. ओट्यावर आहे ठेवलाय दह्याचा सट
टिंब टिंब चा नाव घेते मारून उपर कट

६. लग्नाला बसायला मिळाला चंदनाचा पाट
टिंब टिंबला अजून जमत नाही द पल्लू शॉट

७. भारताने जिंकला मोठ्या दिमाखात विश्वचषक
टिंब टिंब वर राहील माझीं कायम वचक

८. भारताचा कॅप्टन आहे महेंद्र सिंग धोनी
टिंब टिंब शिवाय आयुष्यात नाही कोणी

- विकास सोमण
०८.०४.२०११

टाईमपास .........


दिल्यावर होकार तिने त्याने सोडीला दीर्घ श्वास
पण तिच्यासाठी तो फक्त होता टाईमपास ....

वाहिले सर्वस्व त्याने तिला खास
पण तिच्यासाठी तो फक्त होता टाईमपास ....

विसरला तो "मी" पण तिच्यासाठी खास
पण तिच्यासाठी तो फक्त होता टाईमपास ....

कॉलेज मध्ये असताना बुडविले तास
पण तिच्यासाठी तो फक्त होता टाईमपास ....

वेळेप्रसंगी दिला त्याने त्याच्या तोंडातील घास
पण तिच्यासाठी तो फक्त होता टाईमपास ....

केले दोन दोन प्रेझेटेशन तिच्यासाठी खास
पण तिच्यासाठी तो फक्त होता टाईमपास ....

तिच्या परीक्षेच्या वेळी स्वतःचा सोडीला अभ्यास
पण तिच्यासाठी तो फक्त होता टाईमपास ....

ती आजारी असताना जागवल्या रात्री अनेक
पण तिच्यासाठी तो फक्त होता टाईमपास ....

रात्री अनेकवेळा होत असे त्यास तिचाच भास
पण तिच्यासाठी तो फक्त होता टाईमपास ....

शपथ घेतली पूजीन तुला जोपर्यंत असेल श्वास
पण तिच्यासाठी तो फक्त होता टाईमपास ....

तिच्यासाठी चालला तो नेहमी अनेक कोस
पण तिच्यासाठी तो फक्त होता टाईमपास ....

शिक्षणासाठी तिच्या घेतिले जास्तीचे क्लास
पण तिच्यासाठी तो फक्त होता टाईमपास ....

तिच्यामुळे त्याच्या उतरला करिअरचा क्लास
पण तिच्यासाठी तो फक्त होता टाईमपास ....

विचारले त्याने जेव्हा लग्नासाठी खास
ती म्हणाली तेव्हा: "आता पुरे झाले बास"
कधीच नव्हतास तू माझ्यासाठी तसा खास
होतास तू फक्त माझ्यासाठी टाईमपास ....

------ विकास सोमण
दिनांक : ०७ / ०४ / २०११

आई ......


पोटात वाढवलेस नऊ महिने मला तू
जन्माला पण घातलेस कैक कळा सोसून
दिले अस्तित्व या जागी मला तू
सांग कसे फेडू हे तुझे पांग मी ...

दिले योग्य शिक्षण मला तू
खाल्ल्या खस्ता रोज अनेक तू
केले शहाणे दिले संस्कार तू
सांग कसे फेडू हे तुझे पांग मी ...

भरवलास घास मुखी माझ्या तू
प्रसंगी त्यागीला घास तुझ्या मुखाचा
कसा विसरू सांग मी क्षण त्या त्यागाचा
सांग कसे फेडू हे तुझे पांग मी ...

दिलीस माया मला या स्वार्थी जागी तू
बनविलेस निस्वार्थी मला या जन्मी तू
आदर्श तुझाच ठेवितो मनी मी
सांग कसे फेडू हे तुझे पांग मी ...

केलीस निस्वार्थ सेवा अंथरुणावरीही
विसरलीस तहानभूक सोडीलेस अन्न
आठविले अजूनही कि होते मन सुन्न
सांग कसे फेडू हे तुझे पांग मी ...

जरी जाहलो मी मोठा तरीही
शिकलो उभे राहायला पायावर तरीही
राहीन तुझा अजूनही तान्हा बाळ
सांग कसे फेडू मी हे तुझे पांग ...

चंदनाची उपमा देती हे जग त्यागासाठी
तूच खरे मूर्तिमंत उदाहरण त्यासाठी
दिले सुख मला तू स्वत: दुख सोसून
कसा राहा आई मी तुझ्यावाचून ....

-- विकास सोमण
०५ /०४/२०११